मोठी कारवाई; दरोडा विरोधी पथकाने केले पिस्तूल खरेदी विक्रीचे रॅकेट उध्वस्त
सात पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे जप्त; वेपन डीलर देखील पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी : पिंपरी–चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. वेपन डीलरसह चौघांना अटक करतत्यांच्याकडून सात पिस्तूल आणि पाच काडतुसे अशा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शस्त्रांची शहरात चालणारी बेकायदेशीरखरेदी विक्री यानिमित्ताने मोडून निघाली आहे.
अर्जुन भाऊराव सूर्यवंशी (20, रा. आळंदी), तुषार नथुराम बच्चे (31, रा. शिवाजीवाडी, मोशी), कमल रामदास राठोड (26, रा. नाणेकरवाडी, ता. खेड), अंकित भस्के अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई गणेश सावंत, सुमित देवकर आणि विनोद वीर यांना मरकळ गाव येथे एक गुन्हेगार पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसारपोलिसांनी अर्जुन सूर्यवंशी याला सापळा लावून ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तुलांनी दोन काडतुसे जप्त केली. सूर्यवंशी याच्याविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने वेपन डीलर अंकित भस्के याच्याकडून हे पिस्तूल विकत आणले असल्याचे सांगितले. सूर्यवंशी यानेभस्के याच्याकडून आणखी दोन पिस्तूल आणि काडतूस विकत घेऊन ते सराईत गुन्हेगार तुषार बच्चे याच्याकडे ठेवण्यास दिल्याचेहीत्याने तपासात सांगितले. पोलिसांनी मोशी येथून बच्चे याला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.
दरम्यान, वेपन डीलर असलेला अंकित भस्के याला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलिसांनी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केलीहोती. तो न्यायालयीन कोठडीत असताना पिंपरी–चिंचवड पोलिसांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी दोनपिस्तूल आणि एक काडतूस पोलिसांनी जप्त केले.
अंकित याने आणखी एक पिस्तूल नाणेकरवाडी येथील कमल राठोड याला विकले होते. पोलिसांनी कमल राठोड याला अटक कृंतयांच्याकडून एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले. या कारवाईमध्ये दरोडा विरोधी पथकाने सात पिस्तूल आणि पाच काडतुसेजप्त केली आहेत.
आरोपी अंकित भस्के हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पिंपरी–चिंचवड आणि अहमदनगर येथे शरीराविरुद्धचे गुन्हे, अग्निशस्त्र बाळगणे, तस्करी करणे असे गुन्हे दाखल आहेत. अर्जुन सूर्यवंशी याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारीचे गुन्हे दाखलआहेत. तुषार बच्चे याच्या विरोधात देखील जमाव जमवून दहशत निर्माण करणे, अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. दरोडाविरोधी पथकाने चालू वर्षात पाच कारवायांमध्ये 13 पिस्तूल आणि 13 काडतुसे जप्त केली आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोलीसउपायुक्त शिवाजी पवार, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, सागर शेडगे, राहुल खारगे, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, आशिष बनकर, गणेश हिंगे, चिंतामण सुपे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, नागेश माळी, प्रमोद उलगे यांनी केली.