‘नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं….’

हौसेला मोल नसतं हेचं खरं

0

मुंबई : भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील एका शेतकरी उद्योजकाने हौसेखातर चक्क हेलिकॉप्टर खरेदी केलं आहे. या हेलिकॉप्टरसाठी शेतातचं हॅलीपॅड उभारलं आहे. त्यामुळे त्यांच्या भोईर या हेलिकॉप्टरची चर्चा आता संपूर्ण राज्यभर सुरु झाली आहे.

जनार्दन भोईर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ग्रामीण भागात अलिशान कार, सामान्य गाड्या पाहायला मिळतात. वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केल आहे.

घरी गाडी बंगला असताना जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीवर गोदाम उभारले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. यातून त्यांना प्रचंड पैस मिळाला. यातूनचं जनार्दन भोईर यांचे व्यवसायानिमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील लोकांशी संपर्क येऊ लागला. यातूनचं या नव्या व्यवसायाचे धाडस त्यांनी केलंय.

स्वतःला दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भागात नेहमी जावे लागते तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी घरी सर्व सुखसुविधा असल्याने हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या हौसेची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.