पुणे : पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलीस टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पैसै घेणरे एजंटांच्या शोधात आहेत. पुणे सायबर पोलिसांच्या रडारवर टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील एजंटांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार यानं पोलीस तपासात अभिषेक सावरीकरनं पाच कोटी दिल्याची कबुली दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्या अनुषंगाने पुणे पोलीस तपास करत आहेत.
पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा प्रकरणी तपासाची चक्र वेगवान केली आहेत. टीईटी परीक्षा प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरु झाली आहे. अभिषेक सावरीकरला पैसे देणाऱ्या एजंटांचा पोलीसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून आता एजटांची तपासणी करण्यात येणार आहे.
टीईटी परीक्षा प्रकरणी अभिषेक सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 2018 साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमार याला अभिषेक सावरीनं 5 कोटी रुपये दिल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. ज्या परीक्षार्थीकडून पैसे घेतले त्यांचाही शोध घेतला जाणार आहे.