पिंपरी : कमरेला गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस अडकवून फिरणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. रमाईबागनगर येथील सार्वजनिक शौचालय रावेत येथे सोमवारी (दि.18) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मोनेश देवेंद्र नाटेकर (23, रा. रमाईबागनगर, रावेत) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रवीण वासुदेव मुळूक यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एक गावडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस कमरेला
अडकून फिरताना आढळून आला. शस्त्र विरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून 25,500 रुपये किंमतीचा गावडी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला आहे.