महिला आमदारांची फसवणूक करणाऱ्याला औरंगाबादहून अटक

0

पुणे : आपली आई आजारी असल्याचे सांगून तिच्या औषधोपचारासाठी पैशाची मागणी करुन आमदार माधुरी मिसाळ आणि इतर महिला आमदारांची फसवणुक  करणार्‍या मुकेश राठोड याला बिबवेवाडी पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. 

याप्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कन्या पूजा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्यासह चार महिला आमदारांना फसविण्याचा प्रयत्न मुकेश याने आपल्या साथीदाराच्या मदतीने केला होता. मुकेश राठोड हा मुळचा बुलढाणा येथील राहणारा आहे. गेल्या तीन दिवसांपासून बिबवेवाडी पोलीस त्याचा शोध घेत होते. काल त्यांना तो औरंगाबाद येथे सापडला.

यााबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर मुकेश राठोड याने फोन केला. आपल्या आईला बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी दाखल केले असून तिचे मेडिकलकरीता पैशाची गरज असल्याचे सांगितले. त्यांना एक गुगल पेचा नंबर देऊन त्यावर ३ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार मिसाळ यांनी पैसे पाठविले. त्यांच्या प्रमाणेच विधानसभेतील त्यांचे सहकारी आमदार मेघना बोर्डिकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार श्वेता महाले यांच्याकडेही पैशांची मागणी करुन फसवणुकीचा प्रयत्न केला होता. मात्र, या आमदारांना संशय आल्याने त्यांनी त्याला पैसे पाठविले नव्हते.

Leave A Reply

Your email address will not be published.