व्यवस्थापकावर कोयत्याने वार, कामगारास पोलीस कोठडी

0
पुणे : जबाबदारीने काम करा नाहीतर काम सोडा असे बोलल्याने चिडलेल्या कामगाराने व्यवस्थापकावर कोयत्याने वार केले.  हल्ल्यांत व्यवस्थापक जखमी झाले असून पौड पोलिसांनी कामगारास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रीकांत हनुमंत वाळुंज  (रा. कुंभेरी, ता. मुळशी) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. श्याम पायप्पा पटेल (वय 46, वरिष्ठ व्यवस्थापक, सुविधाप्रमुख ) हे जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅम्बीव्हॅली सहारासिटी परिसरात जुन्या जीमसमोर 28 ऑगस्ट रोजी दुपारी हा प्रकार घडला. फिर्यादी हे अ‍ॅम्बीव्हॅली सहारासिटी येथे फॅसिलिटी हेड (सुविधाप्रमुख ) म्हणून नोकरी करतात. स्पोर्टस सेंटरमधील जुन्या जीममधील सामान नवीन जीममध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.
हे काम करणार्‍या श्रीकांत वाळुंज याने 25 ऑगस्ट रोजी फिर्यादींना मोबाईलवर कॉल करून साहित्य शिफ्ट करताना फुटले तर भरपाई द्यावे लागेल असे सांगितले. त्यावर तुम्ही जबाबदारीने काम करा नाहीतर काम सोडा असे, फिर्यादी त्यास बोलले होते. त्याचा राग मनात धरून काही दिवसांनी 28 ऑगस्ट रोजी साहित्य हलविण्याचे काम सुरू असताना श्रीकांतने पटेल यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तसेच मला कामावरून काढून टाकणार होता आता मी तुला मारतो, असे बोलून कोयत्याने एक वार केला तो फिर्यादींच्या हातावर लागला.  दरम्यान तेथे असलेल्या इतरांनी श्रीकांत याला पकडले. मात्र, त्यानंतर तो दुचाकी घेवून तेथून पळून गेला. जखमी झालेले फिर्यादी पटेल यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले. उपाचार घेतल्यानंतर त्यांनी पौड पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी तपास करीत मंगळवारी दि.31 ऑगस्ट रोजी रात्री  आरोपीस अटक केली.
विशेष सहायक सरकरी वकील निलेश लडकत यांनी आरोपीने केलेला गुन्हा गंभिर स्वरूपाचा असल्याचे न्यायालयास सांगितले तसेच आरोपीने गुन्ह्यांत वापरलेला कोयता जप्त करणे, कोयता सोसायटीमध्ये कसा घेवून आला. त्याला या गुन्ह्यांत कोणी मदत केली आहे का याचा तपास करण्यासाठी त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
Leave A Reply

Your email address will not be published.