पुणे : जमीन गहाण ठेवली असतानाही तिची परस्पर विक्री केल्याप्रकरणात पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. सत्र न्यायाधीश एस.बी.हेडाऊ यांनी हा आदेश दिला. बांदल यांनीच नाव येऊ नये, यासाठी दोघांना हाताथी धरून अधिकाऱ्यांच्या मदतीने कर्ज घेऊन पैसे स्वत:चे फायद्याकरीता वापरले. हप्ते न भरता त्या जमिनीची विक्री केली आहे. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.
या प्रकरणात बांदलसह रुपेंदरकौर हरचरणपाल नंदा, हरचरणपाल मोहनसिंग नंदा (दोघेही, रा. कोंढवा), विजय दिनकर धुमाळ (पिंपळे धुमाळ, ता. शिरूर) आणि गोरख महादेव दोरगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 19 जनेवारी 2015 मध्ये घडलेल्या घटनेबाबत बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. रुपेंदरकौर आणि हरचरणपाल या दोघांच्या नावावर हे कर्ज काढण्यात आले होते. ही जमीन विजय धुमाळ याला विक्री करण्यात आली होती.
या प्रकरणात पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. त्यावेळी दोन्ही नंदा यांनी हा व्यवहार बांदल यांनी केला असल्याचे सांगितले आहे. ही जमीन बांदल याने धमकावून मालक सुरेश शिंदे यांना विकण्यास लावली. व्यवहार 1 कोटी 40 लाख रुपयांचा ठरला असताना, त्यांना केवळ 70 लाख रुपये देण्यात आले आहेत. खुनशी प्रवृत्तीचा आहे. त्यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन 4 गुन्हे तपासावर आहेत. पूर्वी सात गुन्हे दाखल होते. त्याची शिक्रापूर परिसरात दहशत आहे. जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. राजेश कावेडीया यांनी दिली. जमीन विकत घेण्यासाठी 2 कोटी 10 लाख रुपयांचे वडगावशेरी येथील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. ए. खटावकर या गुन्ह्याचा तपास करत आहे.