मणिपूर : गोळीबारात 11 जणांचा मृत्यू; महामार्ग बंद

0

मणिपूर : मणिपूर पुन्हा पेटले आहे. कंग्पोक्पी जिल्ह्यातील खमेन्लोकमध्ये मंगळवारी रात्री बिगर आदिवासी आणि आदिवासी गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ११ लोकांचा मृत्यू झाला. तर ४-५ लोक बेपत्ता आहेत. ९ मृतदेहांची ओळख पटली आहे. १० लोक जखमी झाले आहेत.

सूत्रांनुसार, हल्लेखोरांनी वॉच टाॅवरवरून दुसऱ्या गटावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी बुधवारी या भागात शोधमोहीम राबवली, पण एकालाही पकडण्यात आले नाही. आदिवासींनी राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे. फुंदरेई आणि सुग्नू भागातील काही गावांमध्ये जवानांना झडती घेण्यापासून ग्रामस्थांनी रोखले.

राज्यात मोबाइल इंटरनेट बंदी कायम आहे. १६ पैकी ११ जिल्ह्यांत अजूनही संचारबंदी आहे. रात्री उशिरा जमावाने उद्योगमंत्री नेम्चा किप्गेन यांचे निवासस्थान पेटवून दिले. सुग्नू भागात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आहे. समाजकंटकांनी प्रमुख रस्ते बंद केले आहेत. यामुळे रसद-औषध पोहोचवताना अडचणी येत आहेत. गॅसचे सिलिंडर अडीच हजारांत मिळत आहे. लष्कराने बुधवारी हेलिकॉप्टरद्वारे जीवनावश्यक साहित्य पुरवले.

Leave A Reply

Your email address will not be published.