मणिपूर मधील घटनेचा ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून निषेध

0

पिंपरी : मणिपूर येथे दोन महिलांची धिंड काढलेल्या घटनेचा पिंपरीचिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून निषेध करण्यातआला.

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशनचे माजीअध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर, ॲड. सुजाता बिडकर , ॲड. संगीता परब, ॲड. पूनम राऊत यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी ॲड. उमेशखंदारे, ॲड. गजेंद्र तायडे, ॲड. मेरी रणपिसे, ॲड. धनंजय कोकणे, ॲड. साठे, सचिव ॲड. गणेश शिंदे, ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, सदस्य ॲड. सौरभ जगताप, ॲड. प्रशांत बचुटे, आजी माजी पदाधिकारी वकील उपस्थित होते.

मणिपूर मध्ये मैतयी आणि कुकू समाजात सध्या वाद सुरु आहे. हा विकोपाला जाऊन मैतयी समाजाकडून कुकू समाजातील दोनमहिलांची निर्वस्त्र धिंड काढली. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यानंतर देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रियाउमटल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील यावर दुःख व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.