
केळवडे ( ता. भोर ) येथील निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलची एकहाती सत्ता आली असून चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित पाच जागांवरही निवडणुकीत भैरवनाथ पॅनेलने दणदणीत विजय मिळविला असून यात मनीषा सोनवणे, सुरेखा कोंडे, मंजुश्री कोंडे, आकाश कोंडे, पांडुरंग कोंडे, यशवंत मदने, सोनम कोंडे, प्रमिला कुंभार, निर्मला कदम हे सदस्य म्हणून निवडून आले होते. सरपंच आणि उपसरपंच पदासाठी अनुक्रमे मनीषा सोनवणे व सुरेखा कोंडे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची सरपंच व उपसरपंच म्हणून घोषित केले.
सरपंच आणि उपसरपंच निवडीप्रसंगी यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, माजी सरपंच शांताराम जायगुडे, राजेंद्र कोंडे, बाळासाहेब धुमाळ, संपत कोंडे, धनाजी कोंडे, शिवाजी कोंडे, विलास मरळ, बाळासाहेब कोंडे, नंदू कोंडे, रोहिदास कोंडे, महेश मरळ, पोपट जगताप, सुभाष सोनवणे, नारायण कोंडे, संदीप कोंडे, महेश कोंडे, संतोष कोंडे, आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे, सहायक कृषी अधिकारी सुनील गुरव, ग्रामसेवक अभय निकम यांनी काम पाहिले.