शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी 2023 चा मानकरी; महेंद्र गायकवाड उपकेसरी

0

पुणे : माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संस्कृती प्रतिष्ठाण यांच्या वतीने आयोजन केलेल्या महाराष्ट्र केसरी 2023 चा मानकरी पुण्याचा शिवराज राक्षे ठरला आहे.  चितपट करत महेंद्र गायकवाड याचा पराभूत करत राक्षे हा यंदाचा महाराष्ट्र केसरी बनलेला आहे.

महाराष्ट्र केसरीच्या माती विभागातील पहिली सेमी फायनल पार पडली. यामध्ये सिकंदर शेखचा महेंद्र गाययकवाडने पराभव करत फायनलमध्ये धडक मारलीय. कुस्ती चालू झाल्यावर महेंद्र गायकवाडने पहिला गुण मिळवत खातं उघडलं होतं. परंतु पहिल्या फेरीअखेर सिकंदरकडे 1 गुणांची आघाडी होती. दुसरी फेरी सुरू होताच सिकंदर आक्रमक झालेला दिसला. मात्र उच पुरा गडी महेंद्रने बाहेरची टांग डाव टाकत 4 गुणांची कमाई केली. सिकंदरला सामन्याच्या अखेरपर्यंत सरशी साधू दिली नाही.

गादी विभागामध्ये हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या तुफान कुस्तीमध्ये पहिल्या पासूनच शिवराजने आक्रमण केलं. पहिल्या फेरी अखेर शिवराजने 6 गुण मिळवले होते तर एकवेळचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनला एकही गुण घेता आला नव्हता. दुसऱ्या फेरीमध्ये 1 गुण सोडता शिवराजने 2  गुणांची विजयी आघाडी घेत विजय साकार केला.  शिवराज राक्षेने हर्षवर्धनवर 1-8 ने विजय मिळवला.

दरम्यान,  65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी धडक मारली आहे. अंतिम कुस्तीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये शिवराज राक्षे याने बाजी मारली.  

Leave A Reply

Your email address will not be published.