मुंबई : शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असून महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होणार असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
ईडीचा दबाव असल्याचे अर्जुन खोतकर यांनी मान्य केले आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होणार आहे. कोणीतीही कारवाई करा, मी गुडगे टिकवणार आहे. शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत.
महाराष्ट्रात सध्या भाजप आणि शिवसेनेच्या फुटीर गटाचे दोनच मंत्र्यांचे सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा न्यायालयीन लढा सुरु आहे. यातच संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे खळबळ निर्माण करत आहे.