मराठा समाजाचा 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक

0

पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर आपपल्या वाहनातून धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राजेंद्र कोंढरे म्हणाले की, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यामुळे विद्यार्थी वर्गांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी चर्चा केल्यास, मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागेल.

राज्यातील मराठा समाजाचा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे. यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता राज्याचे महत्त्वाचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर पक्षांच्या सर्व प्रमुख नेते मंडळीनी एकत्रित बसून चर्चा केल्यास मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागु शकतो. अशी भूमिका राजेंद्र कोंढरे यांनी मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.