विवाहित तरुणीने केले प्रियकराचे अपहरण; तरुणीसह तिघांना अटक

0

पुणे : विवाहित तरुणीने प्रियकर तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एनडीए रस्त्यावरून तरुणाचेअपहरण करून त्याला गुजरातमधील वापी येथे नेण्यात आले होते. उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून वापी येथे जाऊनतरुणाची सुटका केली.

पुण्यातील एका तरुणाचे गुजरातमधील वापी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या एका 28 वर्षीय विवाहिततरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, तरुणाच्या आईवडिलांनी त्याचा विवाह करण्याचे निश्चित केल्याने तो पुण्यात परत आला होता. तरुणाने प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या विवाहित तरुणीने तरुणाचे अपहरण करण्याचा कट रचला. इतकेच नाही तर तरुणाचे अपहरणकरुन थेट वापीला नेऊन डांबून ठेवल्याने एकच खळबळ उडाली होती.

आरोपी तरुणीने प्रियकर तरुणाच्या अपहरणासाठी दोघांना सुपारी दिली होती. या प्रकरणी तरुणीसह दोन तरुणांना अटक करण्यातआली आहे. प्रथमेश राजेंद्र यादव (21, रा. बच्छाव वस्ती, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) आणि अक्षय मारुती कोळी (26, रा. पुसेगाव, गोरे वस्ती, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तरुणाच्या भावानेउत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

तरुणाचे कारमधून अपहरण करण्यात आल्याचे एनडीए रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात दिसून आलं होतं. तांत्रिकतपासात आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवारयांच्या पथकाने वापी येथे एका हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका केली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. महिलेच्या दोनसाथीदारांना सातारा, पुसेगाव येथून अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.