बेकायदेशीर गुटख्यावर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा ट्रक भरुन गुटखा जप्त

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने तब्बल 43 लाख 3 हजार 200 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून ही कारवाई पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी कुरळी-निघोजे रोडवर केली.

राजू राम देवासी (21, रा. चिखली), राकेश बीजराम देवासी (19, रा.चिखली), दुधाराम बेहरराम देवासी (29,रा. चिखली), श्रावण कुमार धनेशराम देवासी (29, रा. चिखली) हे चार जण गोकुळ मुरलीधर योगी (34,।रा.नाशिक) याच्या ट्रकमधून गुटखा घेऊन जात होते. या पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुख्यात गुटखा विक्रेता नरेश देवासी याने हा गुटखा मागवला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तालयाच्या वतीने 31 डिसेंबर व भिमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त सुरु असताना पथकातील पोलीस शिपाई विनोद वीर व पोलीस नाईक गणेश हिंगे यांना खबर मिळाली की, कुरळी-निघोजे रोडच्या डाव्या बाजूस दिक्षीका लॉजीस्टीक कंपनीच्या समोर मोकळ्या जागेत गुटख्याने भरलेला टेम्पो थांबला आहे अशी खबर मिळाली.एक मालाने भरलेला ट्रक दुसऱ्या पीएकअपमध्ये काही जण माल भरत होते. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी 43 लाख 3 हजार 200 रुपयांचा गुटखा व तंबाखू जन्य पदार्थ तसेच 10 लाख रुपयांचा टेम्पो तसेच 5 लाख रुपयांचा महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण 58 लाख 3 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला.याबाब म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई दरोडा विरोधी पथक करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, तसेच पोलीस अमंलदार सागर शेडगे, गोविंद सुपे, राजेश कौशल्य, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.