पुणे : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची शिरवळ येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संजय पाटोळे असे खून झालेल्याचे नाव आहे. शिरवळ येथील निरा नदी काठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, संजय पाटोळे हा शिरवळ मधील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात देण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खुनाचे नेमके कारण आणि मारेकरी कोण हे मात्र अद्याप निष्पन्न झाले नाही. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.