मौर्या व दुबे यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले आहेत
साप्ते आत्महत्या प्रकरण, पोलिसांची न्यायालयात माहिती
पुणे : कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणातील आरोपी राकेश मौर्या आणि अशोक दुबे यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले आहेत. या दोघांचे व त्यांच्याशी लिंक असलेले १७ बँक खाते आहेत, असे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात अटक केलेल्या राकेश सत्यानारायण मौर्या (वय ४७, रा. मुंबर्इ) यांची २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रनवागी करण्यात आली आहे. दीपक उत्तम खरात (वय ३७, रा. गोरेगाव) याला अटक करण्यात आली असून त्याला १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात चंदन रामकृष्ण ठाकरे (वय ३६, रा. मुंबई) आणि नरेश बाबूराव विश्वकर्मा (वय ३९, रा. पालघर) यांना यापूर्वी अटक झाली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तर गंगेश्वर अवधेश श्रीवास्तव आणि अशोक रमापती दुबे (दोघेही रा. मुंबर्इ) यांच्यावर गुन्हा दाखल असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
धमकी व खंडणी उकळून मौर्य याने कमावलेले पैसे त्याच्याकडून जप्त करायचे आहेत. त्याने केलेल्या व्यवहारांची चौकशी करायची आहे. तसेच मौर्या याच्या मोबार्इल डेटा जप्त करून त्याचे विश्लेषन करायचे आहे. मौर्या हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे गुन्ह्याचा पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली.
त्यानुसार न्यायालयाने आरोपीची २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. वाकड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.