मुलगी झाल्याचा आनंद गगनात मावेना; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं चिमुकलीला घरी

0

पुणे : मुलगी झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण जिलेबी वाटून अथवा साखर अशा गोड पदार्थाचे वाटप करुन आनंद साजरा करत असतात. त्याचबरोबर अनेकजण डाॅल्बी देखील लावून मनोसोक्त आनंद लुटत असतात. मात्र, म्हणतात ना ”पुणे तिथे काय उणे…” पुण्यातून एक आनोखीच बातमी समोर आली आहे. मुलगी झाल्याचा आनंद साजरा करत चक्क हेलिकॉप्टरमधून नवजात बाळाला घरी आणलं आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलगाव येथे एका मुलीचा जन्म झाला आहे. मुलगी झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी तिच्या वडिलांनी चक्क तिला हेलिकॉप्टरमधून घरी आणले आहे. त्याचबरोबर कन्यारत्नाच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या देखील घालण्यात आल्या आहेत. असा आनंद साजरा करण्यात आला आहे.

अ‍ॅड. विशाल झरेकर यांना मुलगी झाल्याने मनसोक्त आनंद लुटला आहे. त्यामुळे झरेकर यांनी थेट हेलिकॉप्टरमधून नवजात बाळाचे घरी आगमन केलं आहे. वडील विशाल झरेकर यांनी चिमुकलीला आपल्या हातात घेत हेलिकॉप्टरमधून खाली उतरत असल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच प्रसारित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.