एमडीएचचे मसाल्यांचे सर्वेसर्वा धर्मपाल गुलाटींचे निधन 

0

नवी दिल्ली ः ‘असली मसाले सच सच, एमडीच…एमडीएच’, या प्रसिद्ध मसाले कंपनीचे मालक पद्मभूषण धर्मपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ वर्षी हृदयविकाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून चंदादेवी रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी ५.३९ वाजता अखेरचा श्वास घेतला.

धर्मपाल गुलाटी यांनी १९५९ मध्ये पहिल्यांदा एमडीएच मसाले कारखाना सुरू केला. देशभरात एकून १५ कारखाने आहेत. त्यातील ६ कारखाने दिल्लीमध्येच आहेत. एमडीएचचे नाव जगभरात प्रसिद्ध पावलेले आहे.

जगभरातील अनेक शहरांमध्ये एमडीएचचे कारखाने आहेत. २०१९ मध्ये धर्मपाल गुलाटी यांनी २१३ कोटींची कमाई केलेली होती. एमडीएच कंपनीमध्ये ८० टक्के भागिदारी ही धर्मपाल गुलाटी यांची होती. खाद्यपदार्थातील उत्तम काम केल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या हस्ते त्यांना पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.