‘मी रावेत डिस्ट्रिक्ट’ शहराच्या नावलौकिकात भर घालणारा प्रकल्प

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड मेट्रो सिटीमध्ये रावेत परिसरात सर्वात वेगाने गृहनिर्माण प्रकल्प संस्था विकसित होत आहेत. रावेत मधिल सर्वात मोठ्या ‘मी रावेत डिस्ट्रिक्ट’ या गृहप्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडणार असल्याचे, उपस्थित मान्यवरांनी सांगितले. गुरुवारी या प्रकल्पाचे उद्‌घाटन आमदार लक्ष्मण जगताप, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या हस्ते झाले.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, प्रशांत अमृतकर, नगरसेवक योगेश बहल, राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, पोलीस निरीक्षक वसंत बाबर, विवेक मुगळीकर, श्रीराम पोळ, देवेंद्र चव्हाण, बाळकृष्ण सावंत, आसवाणी प्रमोटर्स ॲण्ड बिल्डर्सचे संचालक श्रीचंद आसवाणी, अनिल आसवानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोरोना काळात वैद्यकीय विभाग आणि पोलिस प्रशासनातील कर्मचारी, अधिका-यांनी केलेल्या सेवेबद्दल कोविड योध्द्यांचा संयोजकांच्या वतीने उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात ‘द बॅच ऑफ ऑनर’ देऊन सन्मान करण्यात आला.
विशेष बाब म्हणजे कोविड योध्दांना या गृहप्रकल्पात पाच लाख रुपयांची सवलत आसवाणी प्रमोटर्स ॲण्ड बिल्डर्सच्या वतीने देण्यात येणार आहे. 

रावेत मध्ये सर्व्हे नं. १४९ आणि १५० बीआरटी लिंकरोड, एसबी पाटील पब्लिक स्कूलच्या जवळ निसर्गरम्य परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कुटुंबातील सर्वांसाठी पन्नासहून जास्त अत्याधुनिक सुविधा या प्रकल्पात आहेत. आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, व्यापारी संकुल, रस्ते, रेल्वे स्टेशन, महामार्ग, बीआरटी रस्ता, मॉल, रुग्णालये, एमआयडीसी असा सर्व ठिकाणी दळणवळणाची उत्तम सुविधा या प्रकल्पाला आहे. ४५ मिटर बीआरटी रस्त्यावर प्रकल्पाचे प्रवेशव्दार आहे. हा प्रकल्प २७ एकर जागेत उभा राहणार असून रावेत मधिल सर्वात मोठा गृहप्रकल्प आहे. २७ एकर मधिल सुमारे १२ एकर जागेवर ५० पेक्षा जास्त अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. या मधिल पहिल्या फेजच्या चार इमारतींमध्ये ३५० सदनिकांमध्ये २ बीएचके ८६० स्वे. फुट आणि ३ बीएचके ९८० स्वे. फुट पासून पुढे सदनिका आहेत.

तसेच शनिवारी (दि. २६ फेब्रुवारी) ला सायंकाळी ५ नंतर ‘रायझिंग स्टार टॅलेन्ट शो’ आणि रात्री ८ नंतर ‘आस्थागील यांचा संगित रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचा देखील रसिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन उद्योजक श्रीचंद आसवाणी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.