बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकल दुकानदारांना अटक

0

पुणे : गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाहीत, असे असतानाही बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या विकणार्‍या एका मेडिकल दुकानातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश गव्हाणे (२३, रा. वाघोली) आणि विकास रोकडे (३४, रा. खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना जुना मुंढवा रोडवरील लाईफ स्टाईल फार्मामध्ये घडली आहे.

याप्रकरणी अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक विकास रोकडे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची  विक्री करण्यास बंदी आहे. असे असताना लाईफ स्टाईल फार्मामध्ये बेकायदेशीरपणे गोळ्या विकल्या जात असल्याचे अन्न व औषध विभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार गर्भपातावरील गोळ्या विकत घेण्यासाठी एक बनावट ग्राहक पाठविण्यात आला.

त्यानंतर अन्न व औषध प्रशासन, महापालिका व पोलीस यांनी एकत्रितपणे या दुकानावर छापा घातला. त्यात या दुकानात गर्भपातावरील गोळ्यांचे दोन स्ट्रिप आढळून आल्या. त्या त्यांनी कोंढवा येथून आणल्याचे सांगत आहे. चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.