पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे म्हाडाच्या वतीने आता पुन्हा एकदा लवकरच जवळपास बाराशे सदनिकांसाठी सोडत काढले जाणार आहे. 1200 सोडत काढणारी घरे वीस टक्क्यांतील अर्थात खासगी आणि नामांकित बिल्डरांच्या प्रकल्पामधील असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
कोरोनाच्या महामारीमध्ये समाजातील गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने नवीन विक्रम केला आहे. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार घेऊन खासगी आणि मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून वीस टक्क्यातील फ्लॅट उपलब्ध करुन घेतले. यामुळे पुणे शहरातील प्रसिद्ध आणि बड्या बिल्डरांच्या प्रकल्पातही सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील नागरीकांना घरे मिळत आहेत.
दरम्यान, नितीन माने यांनी पुणे म्हाडाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रारंभीपासूनच गरीब व सर्वसामान्य नागरिकांना घरे मिळवून देण्यात अग्रेसर राहिले आहेत.
यामुळे कोरोना महामारीतही 4-4 सोडत जाहीर करुन अनेक नवीन विक्रम करण्याचा प्रयत्न पुणे म्हाडाने करुन दाखविला आहे. जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागामधील अनेक मोठे बिल्डर म्हाडाला उभेही करत नव्हते. मात्र नितीन माने यांनी सहकार्य साधून वेळप्रसंगी कारवाई करुन अनेक बिल्डरांकडून हे वीस टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करुन घेतला आहे.