राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

0

मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीही बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली होती.

बच्चू कडू यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, “माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी,” आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.

— BACCHU KADU (@RealBacchuKadu) February 19, 2021

यापूर्वी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.