मुंबई : महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील नेते व सरकारमधील मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, उदय सामंत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोरोनाने ग्रासलं होतं. योग्य उपाचारानंतर या मंत्र्यांनी कोरोनावर मात केली. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोरोना चाचणीसंदर्भात माहिती देताना सतेज पाटील यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करुन पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन. माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन. — Satej (Bunty) D. Patil (@satejp) February 9, 2021