मंत्री संजय राठोड यांचीही चौकशी होऊ शकते

0
पुणे : टिक टॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात आवश्यकता वाटल्यास महाविकास आघाडी सरकार मधील वन मंत्री संजय राठोड यांचीही चौकशी केली जाईल, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाचा सर्वच अँगलने तपास करत आहोत, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने थेट संजय राठोड यांचं नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केले आहेत. तरीही गेल्या 12 दिवसांपासून राठोड मीडियासमोर आलेले नाहीत. त्यांनी आपली बाजूही मांडलेली नाही. मात्र, आता पुणे पोलिसांनी त्यांच्या चौकशीचे सुतोवाच केल्याने राठोड सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला 12 दिवस झाले तरी पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच या प्रकरणी काल अरुण राठोड नावाच्या तरुणाला अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही माहिती दिलेली नाही.

पूजा चव्हाण प्रकरणात दररोज नवं नवीन माहिती समोर येत आहे. यामुळे नक्की या प्रकरणात दडलंय काय हे समजत नाही. याबाबत पुणे पोलिसही गप्प असून तपास मात्र युद्ध पातळीवर करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.