राम गोमारे, पाडुरंग बोडके, सचिन वाकडकर यांच्याकडून ‘मिशन कॉम्रेड’ यशस्वी

0

पिंपरी : साऊथ आफ्रिकेत The Ultimate Human Race म्हंणुन जगप्रसिद्ध, खडतर असणारी ९० किलोमिटरची मॅरेथॅान (कॉम्रेड) पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या दोन मित्रांसह इतरांनी यशस्वी पार केली.

हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे राम गोमारे यांनी हि खडतर मॅरेथॉन 11 तास 17 मिनिट आणि 56 सेकंदात पार केली. यासाठी गोमारे यांनी अथक परिश्रम केले आहेत. पोलीस खात्यात असून देखील बंदोबस्त, तपास या सगळ्यातून वेळ काढत स्वतःच्याफिटनेसकडे लक्ष दिले. यामुळेच साऊथ आफ्रिकेतील हि खडतर स्पर्धा ते पार करु शकले.

हिंजवडीवाकड परिसरातील उद्योजक पांडुरंग बोडके यांनी हि खडतर स्पर्धा अवघ्या 9 तास 52 मिनिट आणि 15 सेकंदामध्ये पारकेली. बोडके यांनी चांगलापरफॉम्सकरत कमी वेळात हि स्पर्धा पार केली. स्वतःचे बिझनेस संभाळून सतत मेहनत केली.

सचिन वाकडकर यांनी 11 तास 41 मिनिट आणि 40 सेकंदामध्ये हि स्पर्धा पार केली. वाकडकर यांनी हि स्वतःचे बिझनेस संभाळतफिटनेसकडे लक्ष देत या स्पर्धेसाठी मोठे कष्ट घेतले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, उधोजक पाडुरंग बोडके, सचिन वाकडकर यांनी यापूर्वी कझाकिस्थान येथे पार पडलेल्या स्पर्धेतयश मिळवतआयर्नमॅनकिताब मिळवला आहे. तर आता साऊथ आफ्रिकेतील स्पर्धा पार करतकॉम्रेडकिताब मिळवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.