भंडारा दुर्घटनबद्दल राजकीय वर्तुळात समिश्र प्रतिक्रिया

कोण दुःख व्यक्त करतं आहे, तर कोण सरकारवर टीका करते आहे

0

मुंबई ः भंडारा जिल्ह्यातील आगीच्या घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यावरून राजकीय वर्तुळात राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते राम कदम, रोहित पवार, अशांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांना आपाल जीव गमवावा लागला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. त्याचबरोबर जे बालक जखमी अवस्थेत आहेत ते लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो”, अशी भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. संबंधित दुर्घटनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट केले करण्याचे निर्देश दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त दिली.

देवेंद्र फडणवीस या घटनेवर भाष्य करताना म्हणाले की, “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे केली आहे.

या घटनेवरून भाजपाचे नेते राम कदम यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “भंडारा जिल्ह्यातील हाॅस्पिटलमध्ये १० निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. याला जबाबदार महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे”, अशी टीका राम कदम यांनी सरकारवर केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दुःख व्यक्त करत ट्विट केले की, “भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबियांवर हे दुःख कोसळलं त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!”, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी व्यक्त केल्या आहेत.

भाजपा नेते निलेश राणे यांनीही तिखट प्रतिक्रिया देत म्हणाले की, “भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आले. त्यानंतर धरणवीर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही”, अशी टीका निलेश राणेंनी सरकारवर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.