पिंपरी : मनपा आयुक्त शेखर सिंग यांच्याशी आज आमदारांना बनसोडे यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक शैलेजा मोरे, डब्बु आसवाणी, माजी निलेश शिंदे, आर एस कुमार, प्रसाद शेट्टी, अनुप मोरे, प्रतिक इंगळे, सतिश लांडगे, सोमय्या व माजी नगरसेवक अमित गावडे, सिद्धार्थ अण्णा बनसोडे व प्राधिकरण परिसर व मतदार संघातील अनेक नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्या दौऱ्यावर असल्याने आयुक्त शेखर सिंह यांना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी उपस्थित राहायचे असल्याने वेळअभावी बैठक रद्द करून चर्चा केली व पुढील आठवड्यामध्ये विभागवार आढावा बैठकी घेण्यासाठी वेळ देण्यात येईल असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले असल्याचे बनसोडे यांच्याकडून माध्यमांना कळविण्यात आले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये प्रामुख्याने प्राधिकरण निवासी भागातील कचरा संकलन केंद्र इतरत्र स्थलांतरित करण्याबाबत चर्चा झाली त्यास आयुक्तांनी सहमती दर्शवली असून कचरा संकलन केंद्र इतरत्र स्थलांतरित करण्यात येईल असे आश्वासन दिले व प्रशासनाला तशा सूचनाही दिल्या. याचबरोबर पिंपरी भाजी मंडई गाळेधारक प्रश्न , प्राधिकरण एलआयसी कॉलनीतील अडचणी व भटक्या प्राण्यांबाबत चर्चा झाली.
पुढील आठवड्यात बैठक घेऊन मतदारसंघातील इतर प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार बनसोडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे.