तुकोबांच्या पालखीचे आमदार लांडगेंकडून ‘सारथ्य’

भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत

0

पिंपरी : जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे उद्योगनगरी पिंपरीचिंचवडमध्ये आगमनझाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पालखीचे सारथ्य केले.

पिंपरीचिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. टाळमृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी आज शहरात दाखल झाले आहेत. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने अवघी उद्योगनगरीदुमदुमून निघाली.

भारतीय जनता पार्टी आणि आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी खाऊ वाटप, छत्री वाटप, पाणी बॉटल वाटप, रेनकोट वाटप यासह प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी आमदार उमा खापरे, माजी महापौर राहुल जाधव, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी सभापती नितीन लांडगे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, पिंपरी विधानसभानिवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, तुकोबारायांच्या पाखलीचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभले. भारतीय जनता पार्टी आणि तमाम पिंपरीचिंचवडकरांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. सर्व भेद अभेद बाजूला सारुन हरीचे नाम प्रेमाने उच्चारावे हीच खरीहरीची सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हा देव केवळ भक्तीभावानेच संतुष्ट होतो म्हणजे हरीनाम घोष चालू आहे तेथेच हा हरीराहात असतो.” याची अनुभूती आली.

Leave A Reply

Your email address will not be published.