आमदार शेळके यांनी आम्हाला राजकारणात अक्कल शिकवू नये : राहुल कलाटे

0

पिंपरी : राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यात चांगलेच युद्ध पेटले आहे. दोघांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू  आहेत. शेळके स्वतः भाजप मध्ये पदाधिकारी होते ते आमदार होण्यासाठी राष्ट्रवादीत आले. त्यामुळे त्यांच्याकडूनराजकारणाचे धडे घेण्याची  गरज नाही. त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. असा इशारा चिंचवड मतदार संघातील अपक्ष उमेदवारराहुल कलाटे यांनी दिला आहे. मी स्वतः चिंचवड मतदार संघाच्या विकासासाठी कामे केली आहेत विविध प्रश्नांवर आंदोलने ही केलीआहेत त्याच बळावर मी जनतेच्या आशीर्वादाने मी ही निवडणूक लढवत आहे चिंचवडची सुज्ञ जनता निश्चितपणे माझ्यामागे उभी राहीलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पिंपळे निलख येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार सुनील शेळके यांनी कलाटे यांच्या संदर्भात वक्तव्य केलेहोते. कलाटे यांना आम्ही येत्या 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत   मावळ मतदारसंघातून तिकिटाची ऑफर दिली ती त्यांनीनाकारली मग आम्ही पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अनिल भोसले यांच्या जागी विधानपरिषद निवडणूक लढविण्याची हीऑफर दिली. मात्र तीही ऑफर त्यांनी नाकारली कारण त्यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवायचीच होती त्यांचा बोलावताधनी दुसराच आहे योग्य वेळी आम्ही सांगू असे शेळके यांनी म्हटले होते. त्याला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवारराहुल कलाटे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.

कलाटे यांनी म्हटले आहे की, वाकड परिसरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी अनेक विकास कामे केली आहेत. राज्यशासनाकडे पाठपुरावा करून नगर विकास विभागामार्फत ही कामे जनतेच्या विकासासाठी मार्गी लावली.अनेक विकास कामांसाठी केंद्र राज्य सरकारकडे पाठपुरावा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.