मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाणार अयोध्येला

0

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असून सहकाऱ्यांसोबत श्रीराम प्रभूंचं दर्शन घेणार आहेत. मुंबईत आज (29 जानेवारी) झालेल्या बैठकीत पक्षाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

23 जानेवारी 2020 रोजी मनसेने आपला झेंडा बदलला, तो भगवा झाला. मनसेने हिंदुत्त्वाची कास धरली. पक्षाच्या झेंड्यातील बदल आणि मनसेची मराठीच्या मुद्द्यासह हिंदुत्त्वाची स्वीकारलेली भूमिका यामुळे राज ठाकरे अयोध्या वारी करणार का असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत होते. या प्रश्नांची उत्तर देण्याची तयारी पक्षाने सुरु केल्याचं समजतं.

बाळा नांदगावकर यांच्या माहितीनुसार, राज ठाकरे 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत. भाजप आणि मनसे एकत्र येणार का? अशीही चर्चा रंगली होती. मनसेने उत्तर भारतीयविरोधी भूमिका सौम्य केली तर आम्ही विचार करुन असं उत्तर भाजपच्या नेत्यांकडून मिळत होतं. त्यामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे त्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे.

राज ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला तर ते उत्तर भारतीयांजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा होऊ शकते. 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन असतो. अयोध्या दौऱ्याहून परतल्यानंतर राज ठाकरे पक्षाला संबोधित करतील. तर 9 मार्चनंतर महिनाभर राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.