शहरातील दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई

0

पिंपरी : शहरातील दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये (मोक्का) कारवाई करण्यात आलेली आहे. निगडीमधील अमोल वाले टोळी आणि पिंपरीतील धर्मेश पाटील टोळीचा यामध्ये समावेश आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले आहेत.

टोळी प्रमुख धर्मेश शामकांत पाटील (25, रा. गोकुळधाम हाऊसिंग सोसायटी, पुणे), स्वप्निल संजय कांबळे (28, रा. आदर्शनगर, पिंपरी), सोनु विनोद पारचा (30, रा. मिलींदनगर, पिंपरी), रशिद इर्शाद सय्यद (26, रा. श्रमिक नगर, पिंपरीगाव), राज दत्ता चौरे (रा. मोठी मस्जिद जवळ, मिलींदनगर, पिंपरी) अशी मोक्काची कारवाई झालेल्या पिंपरीतील गुन्हेगारांची नाव आहेत.

या टोळीवर सन 2020 मध्ये पिंपरी पोलीस ठाण्यात एक गंभीर दुखापत करून दरोडा घातल्याचा एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना हे पाच आरोपी वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून त्या गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्याचा प्रस्ताव पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी अपर पोलीस आयुक्तांकडे पाठवला. त्यानुसार अपर आयुक्तांनी आज (मंगळवारी, दि. 12) या टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई पीसीबी (गुन्हे शाखा)चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे, अंमलदार सचिन चव्हाण, अनिल गायकवाड, ओंकार बंड यांनी केली आहे.

टोळी प्रमुख अमोल बसवराज वाले (23, रा. इंदिरानगर, ओटास्किम, निगडी), मेघराज ऊर्फ राज संजय वाले (25, रा. इंदिरानगर, ओटास्किम, निगडी), आनंद बसवराज वाले (19, रा. इंदिरानगर, ओटास्किम, निगडी) अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नाव आहे. या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

सन 2020 साली झालेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी अमोल वाले, मेघराज वाले आणि आनंद वाले हे वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्फत या टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर आयुक्तांकडे पाठवला. त्यानुसार अपर आयुक्तांनी या टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई पीसीबी (गुन्हे शाखा)चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, अंमलदार सचिन चव्हाण, संदिप दानवे, निलेश चासकर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.