पुणे : नगर रोडच्या एसएस गँगचा म्होरक्या निखील देवानंद पाटील यांच्यासह तब्बल 24 जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखली करण्यात आलेली ही 68 वी कारवाई आहे.
नानासाहेब बाबुराव शिंदे, आशुतोष नानासाहेब शिंदे, शुभम रामचंद्र वाबळे, ऋग्वेद उर्फ छकुल्या जालिंदर वाळके, माऊली उर्फ केतन रामदास कोलते, ऋतिक महादु किनकर, अभिषेक रविंद्र गव्हाणे, प्रतिक अनिल कंद, ऋषिकेश सत्यवान आरगडे, शुभम उर्फ मोन्या अशोक भंडारे, आलोक महादेव सुर्यवंशी, अभिषेक भानुदास लंघे, ओंकार सुनिल इंगवले, गणेश अशोक भालेराव, अथर्व अंकुश कंद, गणेश रामकिसन राऊत, दिपक रंगु राठोड, रोहन ऋषीकेश गायकवाड, रवि धोंडीराम चव्हाण, प्रतिक दिलीप तिजोरे, अक्षय बापुराव गिरीमकर, निलीश जितेंद्र काळे, निखिली नितीन जगताप अशी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
सचिन शिंदेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एसएस गँगने 12 जानेवारी 2022 रोजी सनी शिंदे आणि कुमार शिंदे याचा हत्यारांचा वापर करून निघृण खून केला होता. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, गुन्हे निरीक्षक राजेश तटकरे, मारूती पाटील यांनी मोक्काचा अहवाल तयार केला. दरम्यान, परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी अहवाल अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोक्का कारवाईस मंजुरी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव करीत आहेत.