गुंड सचिन पोटे, लाईन बॉय अजय शिंदे याच्यासह 9 जणांवर मोक्का

0
पुणे : गुंड सचिन पोटे आणि अजय शिंदे यांच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज मोक्कानुसार कारवाई केली आहे. आयुक्तांच्या मोक्का कारवाईने मात्र सराईत गुन्हेगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

सचिन निवृत्ती पोटे (40), अजय अनिल शिंदे (36), विठ्ठल महादेव शेलार (38), अजिंक्य उर्फ अजय उर्फ अज्जू राजाराम पायगुडे (28), दगडू भीमराव वैद्य (वय 36), अनुप अशोक कांबळे (36), अतिक इस्माईल शेख (33), मुन्ना उर्फ हेमंत मारुती कानगुडे (35), बाबू उर्फ अंकुश धारू निवेकर (26) आणि अमोल सतीश चव्हाण (31) अशी कारवाई करण्यात आलेल्या नावे आहेत.

मुंढव्यात वायकीकी टिकी लाऊंज या बड्या हॉटेलात दाम्पत्य वाढदिवस असल्याने आले होते. यावेळी सचिन पोटे, त्याचे साथीदार याठिकाणी होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. वादातून सचिन पोटे याने फिर्यादी यांच्यावर गोळीबार केला होता. हे सर्व प्रकरण 2018 सालात घडले होते. त्यावेळी मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोळीबार झाला नाहीच, असा दावा केला होता. मात्र याबाबत तक्रार आल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी याप्रकरणी चौकशी करत गुन्हा दाखल करत कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अजय शिंदे एकाला अटक केली होती. यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान सचिन पोटे याने संघटित टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी गुन्हा करत असल्याचे समोर आले.

या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणी ल, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पथक करत आहे. त्यांनी या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करावी असा प्रस्ताव उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी या प्रस्तवाची छाननी केली. तसेच तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. त्यानुसार पोलीस आयुक्त यांनी मोक्कानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान, अनेक नामचीन गुंड तसेच बेकायदेशीर उद्योग करणारे अनेक जण पुणे पोलिसांच्या रडारवर असून पोलिस त्यांची माहिती घेत आहेत. त्यांच्यावर देखील मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.