बालेवाडी स्टेडियम मध्ये खेळाडूचा विनयभंग; प्रशिक्षकास अटक

0

पिंपरी : बालेवाडी क्रीडा संकुलात बॅडमिंटन शिकवणाऱ्या प्रशिक्षकाने खेळाडू महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी 10 वाजता घडला आहे. पोलिसांनी प्रशिक्षकास अटक केली आहे.

राकेश यशवंत दलाल (36, रा. म्हाळुंगे, मुळशी) याला अटक केली असून महिलेने फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला बालेवाडी क्रीडा संकुलात बडमिंटन शिकण्यासाठी जाते. शनिवारी नेहमी प्रमाणे पीडित खेळण्यासाठी गेली होती. त्यानंतर प्रशिक्षक दलाल याने पीडितेस बॅडमिंटन शटलचे बॉक्स जिममधील लॉकर मध्ये ठेवण्यास सांगितले.

पीडित बॉक्स ठेवण्यासाठी गेली असता दलाल तिच्या पाठीमागे गेला. ‘तू शुक्रवारी खेळायला का येत नाही, तू चांगली खेळाडू आहेस, मला तुझा खेळ फार आवडते, मला तुला फार वरती घेऊन जायचे आहे, तू आज फार छान खेळलीस’ असे म्हणून शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला. त्यावेळी पीडितेने हातात हात दिला असता तिला स्वतःकडे ओढून विनयभंग केला.

भीतीने पीडित पळून जात असताना त्याने पुन्हा हात पकडून ‘तू इकडे ये, तू इकडे ये’ असे म्हणून अडविण्याचा प्रयत्न केला. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.