नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांसह ज्याची प्रतिक्षा करीक होते तो मान्सून आज अंदमान निकोबार बेटांसहबंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात दाखल झाला.
यंदा मान्सून जवळपास आठवडाभर आधीच अंदमानात दाखल झाला आहे.खालच्या उष्णकटीबंधीय पातळीमध्ये नैऋत्य दिशांनाबळकटी देण्याच्या दृष्टीने व्यापक पर्जन्य क्रियाकलाप आणि परिसरातील सतत ढगाऴपणा यामुळे नैऋत्य मान्सून बंगालच्याउपसागरातील काही भागात अंदमान निकोबर बेटांचा बहुतांश भाग आणि अंदमान निकोबार बेटांचा बहुतांश भाग आणि अंदमान समुद्रातपोहचला आहे.
मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात,संपूर्ण अंदमान समुद्र आणि अंदमान बेटे आणि पूर्वमध्य बंगालच्याउपसागराच्या काही भागात पुढील 2-3 दिवसांत पुढे जाईल अशी अनुकूल स्थिती आहे. पुढील पाच दिवसांत अंदमान आणि निकोबारबेटांवर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसऴधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
त्याशिवाय 16 ते 18 मेदरम्यान अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि पुर्व मध्य बंगालच्या उपसागरात 40 ते 50 किमी प्रतितास वेगानेवादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.