मान्सून : राज्यातील पाच जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

0

पुणे : राज्यात मान्सूनचा पाऊस जोरात पडत आहे. सातारा, कोल्हापूर, मुंबई, लोणावळाआदी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अशरक्षः धुमाकूळ घातला आहे. येत्या तीन दिवसांत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्यात रेड अर्लट जारी करण्यात आला.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांत सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे दरड कोसळल्याने महामार्ग काही काळ ठप्प होता. ही दरड हटवण्यात आली. त्याचबरोबर चिपळूण, संगमेश्वर परिसरातही अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिह्यातही अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांत विजेचा लपंडाव सुरू आहे, तर पावसामुळे मातीच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.

जिह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 83.44 मिमी तर एकूण 697.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये मंडणगड 60.30 मिमी, दापोली 32.20 मिमी, खेड 165.40 मिमी, गुहागर 58.40 मिमी, चिपळूण 84 मिमी, संगमेश्वर 109.20 मिमी, रत्नागिरी 69.20 मिमी, राजापूर 85.30 मिमी, लांजा 87 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली असून नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. जिह्यातील 53 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.