मुंबई : मॅगी बनवणाऱ्या नेस्ले कंपनीचा एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये नेस्लेचे 60 टक्क्यांपेक्षा अधिक फूड आणि ड्रिंक प्रॉडक्ट्स अनहेल्दी म्हणजेच पौष्टिक आहाराचे निकष पूर्ण करणारे नसल्याचं कंपनीने मान्य केलंय. तसंच ही प्रॉडक्ट कशी हेल्दी करता शकतात, याबाबत काम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
मॅगी नूडल्स, किटकॅट आणि नेस्कॅफे बनवणाऱ्या नेस्ले कंपनीने एका इंटरनॅशनल डॉक्युमेंटमध्ये ही बाब मान्य केली आहे. तसंच म्हटलंय की, जनमानसात रुजलेल्या पौष्टिक आहाराच्या निकषांवर 60 टक्के पदार्थ खरे उतरत नाहीत. तसंच त्यांचे काही पदार्थ कधीच हेल्दी म्हणजेच खाण्यासाठी पूर्णपणे चांगले पौष्टिक होणार नाहीत, असंही कंपनीने मान्य केलंय. या पदार्थांवर कितीही काम केलं तरी ते तसेच राहतील.
यूके बिझनेस डेली फायनॅन्शियल टाइम्सच्या वृत्तात म्हटलंय की, ऑस्ट्रेलियाच्या हेल्थ स्टार रेटिंग सिस्टमने माहितीनुसार, नेस्लेच्या केवळ 37 टक्के फूड आणि ड्रिंक प्रॉडक्ट्सचं रेटिंग 3.5 पेक्षा जास्त होतं. या फूड प्रॉडक्ट्सना ते किती आरोग्यदायी आहेत, त्यानुसार 5 पैकी रेटिंग दिलं जातात. दरम्यान कंपनीचे ड्रिंक आणि डेअरी प्रॉडक्ट्स तुलनेने चांगले आहेत.
कंपनीच्या रिपोर्ट्सनुसार कन्फेक्शनरी आणि आईस्क्रीम जनमानसात रुजलेल्या पौष्टिक आहाराच्या निकषांवर 90 टक्के खरे उतरत नाहीत. कंपनीच्या या रिपोर्टवर नेस्लेच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, कंपनी लोकांच्या जीवनातील विविध टप्प्यात पूर्ण पोर्टफोलिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून आमची प्रॉडक्ट्स ग्राहकांना पौष्टिक आणि संतुलित आहार देऊ शकतील. कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटलंय की, गेल्या दोन दशकात आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये साखर आणि मीठाचा वापर कमी केलाय. तसेच गेल्या काही वर्षात आम्ही लहान मुलं आणि कुटुंबांसाठी पौष्टिक आहाराचे निकष पुर्ण करणारे हजारो प्रॉडक्ट लाँच केले आहेत.