पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

0
मुंबई : पनवेल आणि नवी मुंबईत पाच वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. 600 हून अधिक पोलिसांची आयुक्तालयाच्या अंतर्गत बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 646 कर्मचाऱ्यांची बदली राज्य शासनाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आस्थापना मंडळाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे.
बदली करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस ठाणे  नियंत्रण कक्ष पोलीस मुख्यालय , वाहतूक शाखा , गुन्हे शाखा ,आरबीआय,अतिक्रमण आणि विशेष शाखेतील पोलिसांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्याने 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण केला आहे. अशा 646 कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यावर पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार या बदल्या बुधवारी (दि.28) रात्री पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी केल्या.
बुधवारी रात्री करण्यात आलेल्या 646 पोलिसांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये 646 जणांचा समावेश आहे. यामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 47 सहायक पोलीस उप निरीक्षक, 195 पोलीस हवालदार, 209 पोलीस नाईक, 195 पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.