पुणे : पुणे शहरात गेल्या 24 तासात तब्बल 743 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
दिवसभरात 382 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात गेल्या 24 तासात तिघांचा मृत्यू झाला असून पुण्याबाहेरील एकाचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. सध्या 207 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 99 हजार 696 वर जाऊन पोहचली आहे. आतापर्यंत सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 91 हजार 300 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 3 हजार 559 सक्रिय रूग्ण आहेत. आतापर्यंत पुण्यातील 4 हजार 837 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.