मोशीतील कचऱ्याच्या डोंगरांची अखेर विल्हेवाट!
- बायोमायनिंग प्रकल्पाला स्थायी समितीची मान्यता - आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते.
पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळाले आहे.
पूर्वी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे अनिवार्य : संजय कुलकर्णी
महापालिका पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले की, मोशी येथील कचरा डेपोवर गेल्या २० ते २५ वर्षांपासून कचारा टाकला जातो. सध्यस्थितीला शहरातून दैनंदिन सुमारे १ हजार ५० टन कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने २०१९ मध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाची क्षमता दैनंदिन १ हजार टन इतकी आहे. त्यामुळे पूर्वी टाकलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य होते. त्यामुळे महापालिका पर्यावरण विभागाने मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याबाबत निविदा प्रक्रिया राबवली होती. निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कंपनीला कामाचे आदेश देण्याबाबत आम्ही स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच बायोमायनिंगच्या कामाला सुरूवात होईल.