गिर्यारोहकांची शासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही, ही मोठी खंत : छत्रपती संभाजीराजे

एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या 'सागरमाथा : गाथा एव्हरेस्टच्या विजयाची' पुस्तकाचे प्रकाशन

0

पिंपरी : एव्हरेस्टसारख्या शिखरावर चढाई करणे ही एक प्रकारची लढाईच आहे. कसलेल्या गिर्यारोहकांची जन्म मरणाची ही कसोटीअसते, त्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर या गिर्यारोहकांची शासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही, ही मोठी खंत माजी खासदारछत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

एव्हरेस्टवीर श्रीहरी अशोक तापकीर यांच्यासागरमाथागाथा एव्हरेस्टच्या विजयाचीया पुस्तकाचे प्रकाशन संभाजीराजे यांच्या हस्तेकरण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गिर्यारोहक ऋषीकेश यादव होते. महाराष्ट्रातील पहिलेएव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, ज्ञान आशा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अमित आंद्रे, ज्ञानेश्वर तापकीर, माजी महापौर नितिन काळजे, साहित्यिक कामगार नेते अरूण बोऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते.

एव्हरेस्ट शिखरावर जावून भारताचा राष्ट्रध्वज उंचवणाऱ्या या खेळाडूंचा यथोचित सन्मान राज्य सरकारने करायला हवा. एवढेच नाहीतर, त्यांना प्रोत्साहन देण्याची योजना असायला हवी. यासाठी आपण स्वतः शासनाकडे पाठपुरावा करू, असे छत्रपती संभाजीराजेम्हणाले.

यावेळी सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचे आणि ज्ञान आशा फाउंडेशनच्या संकेतस्थळांचे युवराज संभाजीरजे यांच्या हस्ते अनावरणकरण्यात आले. महाराष्ट्रातील पहिले गिर्यारोहक सुरेंद्र चव्हाण यांनी श्रीहरी तापकीर यांचे कौतुक करताना सामान्य शेतकरी कुटुंबातीलहा युवक जिद्द, चिकाटी आणि प्रखर आत्मविश्वास याच्या बळावर जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करून थांबला नाही, तर आपल्याअनुभवाची शिदोरी नवीन गिर्यारोहकांना देत राहिला, असे गौरव उद्गार काढले.

सागरमाथा गिर्यारोहण संस्था आणि ज्ञानआशा फाउंडेशन या संस्थांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, शरद कुलकर्णी, किशोर धनकुडे, भगवान चवले, लहू उघडे आणि सुविधा कडलग या गिर्यारोहकांचा संभाजीराजे यांच्या हस्ते सन्मानकरण्यात आला. तसेच दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे आणि श्रीहरी तापकीर यांच्या माता पित्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.