खासदार अमोल कोल्हे यांनी शब्द पाळला; बैलगाडीच्या बारी मोर्‍हं पळवली घोडी

0

आंबेगाव : बैलगाडा शर्यत सुरु होताच पहिल्या बारीसमोर तुमचा हा पट्टया घोडी धरेल असा शब्द खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान दिला होता. यावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना आवाहन देत शर्यतीमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या असे म्हंटले होते. आज खासदार कोल्हे यांनी दिलेला शब्द सत्यात उतरवत निमगाव दावडी येथील बैलगाडा शर्यतीला हजेरी लावत बारी मोर्‍हं घोडी पळवली.

यावेळी बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, या घाटातील प्रत्येक बैलगाडा चालक व मालकाने मला संसदेमध्ये पाठविण्यासाठी जीवाचे रान केले त्यांच्या ऋणातून उतरंडी झाल्याचे समाधान आज घोडीवर बसल्यावर वाटलं असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक बैलगाडा मालक व चालक मा.सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सूचनाचे पालन करत बैलगाडा शर्यत भरवत असल्याची भावना व्यक्त करत.

बैलगाडी शर्यत हा केवळ नाद न राहता ती जागतिक पर्यटनासाठी प्रसिद्ध व्हावी याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.