खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण

0
सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आईला कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती बरी आहे. दरम्यान, आता उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्ली येथील लोकसभेचे पावसाळी अधिवेशन आटोपून पुणे येथे आल्यानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना अस्वस्थ वाटू लागले होते.
दरम्यानच्या काळात उदयनराजे यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील 3 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या लोकांकडून कळतेय.
Leave A Reply

Your email address will not be published.