खासदार नवनीत राणा यांचा खोटारडे पणा उघड

आयुक्त संजय पांडे यांनी व्हिडीओ केला ट्विट

0

मुंबई : ‘मातोश्री’विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याआधी पोलीस ठाण्यात आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या संबंधी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना एक पत्र लिहिले असून त्यामध्ये हा आरोप केला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

संजय पांडे यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ ट्विट करत राणा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ खार पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले जात आहे. ‘आम्हाला आणखी काय बोलण्याची गरज आहे का,’ असंही पांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पांडे यांनी यापेक्षा काहीही न लिहिता व्हिडीओतून पोलीसांनी कोणतीही चूक केली नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थेट संजय पांडे यांनीच हा व्हिडीओ ट्विट केल्याने त्याला महत्व प्राप्त झालं आहे.

पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य अत्यंत शांत वातावरणामध्ये चहा पित असल्याचे दिसत आहे. त्यांच्यासमोर पाण्याची बाटलीही दिसत आहे. तिथे कसलीही लगबग, गोंधळ दिसत नाही. इतरांसोबत चर्चा सुरू असल्याचे दिसते. पांडे यांनी हा व्हिडीओ ट्विट करत एकप्रकारे राणा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषदेत या आरोपांना दुजोरा दिला होता. दरम्यान, सध्या रवी राणा व नवनीत राणा न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नवनीत राणा या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात राणा म्हणाल्या आहेत की “आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिले नाही. तसेच माझ्या जातीवरुन माझा पोलीस ठाण्यात छळ केला गेला. खालच्या जातीची असल्याने मला बाथरुम वापरु दिले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी रविवारी शिवसेनेवर असाच एक आरोप केला होता. मागासवर्गीय महिला आहे म्हणून मला शिवसेनेकडून अपमानस्पद वागणूक दिली जात आहे. माझ्याबदल खालच्या दर्जात बोलले जात आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.