खासदार संभाजीराजे लढवणार ‘अपक्ष’ निवडणूक

0

पुणे : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले. ही निवडणूक ते अपक्ष लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथे नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले. तर लवकरच स्वराज्य नामक संघटना स्थापन करणार असल्याचीही महत्त्वाची घोषणा केली.

निवडणुकीसाठी ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत. लोकांना स्वराज्याच्या छत्राखाली एकत्रित आणण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वराज्य संघटनेबाबत सांगताना ते म्हणाले, की लोकांच्या अन्यायविरुद्ध लढा देणार. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे विचार महाराष्ट्रात पोहचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://fb.watch/cYtxZwiT5Z/

लोकांच्या हितासाठी ही संघटना ते स्थापन करणार आहेत. उद्या ही संघटना राजकिय पक्षात रूपांतरित होऊ शकते. जरी ती राजकीय पक्ष झाली तरी वावगे ठरणार नाही. पण पहिले उद्दिष्ट सध्या लोकांना संघटीत करणे हेच आहे. त्यासाठी या महिन्यातच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे त्यांनी घोषित केले.

काही दिवसांपूर्वी संभाजीराजे यांना गाभाऱ्यात प्रवेश न करू दिल्यामुळे ते चर्चेत आले होते. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या संभाजीराजे यांना पुजारी शितोळे यांनी गाभाऱ्यात अडवले. त्यावरुन ते खूप भडकले होते. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत खडे बोल सुनावले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.