खासदार संजय राऊत यांची आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद

0

मुंबई :  शिवसेनेचे खासदार संजय राऊतआज शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. स्वतः राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. याआधी राऊतांनी 15 फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजताच पत्रकार परिषद घेत भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे भाजप नेते किरीट सोमय्या होते. त्यामुळं आता उद्या ते कोणता बॉम्ब फोडणार? कोणते नेते त्यांच्या निशाण्यावर असणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरु होता. त्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी केली. 

Leave A Reply

Your email address will not be published.