खासदार संजय राऊत यांच्या पत्नीची होणार ईडीकडून चौकशी

0

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. सकाळी अकरा वाजता त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. गोरेगावमधील पत्राचाळप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशीसाठी हे समन्स बजावले आहे. पत्राचाळ घोटाळा तसेच अलिबागमधील जमीन खरेदी प्रकरणातील व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

जमीन खरेदीची काही कागदपत्रे ईडीने कोर्टात सादर केली आहेत. राऊत यांच्या नावावर काही अनोळखी लोकांची पैसे पाठवल्याचा दावा देखील ईडीने केला आहे. त्यानुसार आता याप्रकरणी पैशांच्या व्यवहाराची देखील चौकशी होणार आहे. ईडीने वर्षा राऊत यांची याआधीही पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी केली होती.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक केली आहे. आता या सगळ्या प्रकरणात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने समन्स बजावले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या सोबत त्यांच्या पत्नींच्या अडचणीत देखील वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. आठ ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना न्यायालयाने ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. खात्यात कोटयावधी रुपये आले कसे? या मागचा सूत्रधार कोण आहे याचा ईडी तपास करणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.