पुणे : ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज कासार आंबोली येथे पार पडला. मुळशी तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतीपैकी तब्बल ४८ गावातील सरपंच पद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. तर ५४ जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव असून यामध्ये महिलांना २७ जागा आरक्षित झालेल्या आहेत. कासारआंबोली, ता.मुळशी येथील सैनिकी शाळेत तहसिलदार अभय चव्हाण, नायब तहसिलदार भगवान पाटील यांनी ही सोडत आज जाहीर केली.
९५ पैकी ४५ गावांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहिर होणार असल्याने त्याच्या सरपंच पदाबाबत मोठी उत्सुकता होती. यामध्ये हिंजवडी, माण, मारूंजी, नेरे, जांबे, सुस, घोटवडे, अंबडवेट, कासार आंबोली, पौड, लवळे, भुकूम, आंबवणे, म्हाळुंगे या ग्रामपंचायती बाबत येथील ग्रामस्थांना विशेष उत्सुकता होती. आयटीनगरी हिंजवडीचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने हिंजवडीकर इच्छूक उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून हिंजवडीत मोठी चुरस पहायला मिळणार आहे.
तर आयटीव्हिलेज माणमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गातील स्त्रीसाठी सरपंचपद आरक्षित झाल्याने माणमध्ये मात्र थोडीशी नाराजी पसरली. आंबवणे, घोटवडे, कासारआंबोली, मारुंजी, जांबेमध्ये माण सारखीच परस्थिती आहे तर नेरे, अंबडवेट, पौड, सूस, लवळे मध्ये मात्र हिंजवडीप्रमाणे नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
आरक्षित झालेल्या आरक्षण निहाय गावांची यादी.
सर्वसाधारण (खुला)
हिंजवडी, नेरे-दत्तवाडी, सुस, पैाड-विठठलवाडी, लवळे, अंबडवेट, भरे, शेरे, शेडाणी-नांदिवली, जवळ-केमसेवाडी, जामगाव-दिसली, कोंढूर, मुळशी खुर्द-टाटा तलाव, माले-दत्तवाडी, बावधन बु, भुगाव, आंदेशे, वाळेण, वांद्रे-पिंपरी, भोयणी(साखरी), वडगाव, भोडे-वेडे, मुगाव (कोळोशी-गडले). खेचरे, वारक, कुळे, मुठा-मोरवाडी-भरेकरवाडी.
सर्वसाधारण स्त्री
भुकूम, आंबेगाव, नांदे, खुबवली, रावडे-हुलावळेवाडी, कोळवण-डोंगरगाव-होतले, खांबोली, बेलावडे, साठेसाई, मांदेडे, नांदगाव, हाडशी, मारणेवाडी, बोतरवाडी, माळेगाव, खारावडे, वेगरे, निवे, डावजे-कातवडी, मोसे खुर्द-धडवल-साईव खुर्द, आडमाळ, धामण ओहळ, दासवे-वडचली-पडळघर, दारवली, कोंढावळे-कळमशेत, वळणे, चिंचवड.
मागास प्रवर्ग (खुला)
कासारआंबोली, मारुंजी, कातरखडक-आंधळे, रिहे-पडळघरवाडी, मुलखेड, पिरंगुट-मुकाईवाडी, लव्हार्डे, आंदगाव, टेमघर, चाले-सावरगाव-करमेाळी, बार्पे, चिखलगाव, वांजळे, भालगुडी.
मागास प्रवर्ग स्त्री
माण-भोईरवाडी, घोटावडे-भेगडेवाडी-आमलेवाडी-मातेरेवाडी-गोंडाबेवाडी, आंबवणे (माजगाव, सालतर, पेठ शहापुर, देवघर, विसाखर, कोळवली), म्हांळुगे, पिंपळोली, अकोले, नाणेगाव, मुगावडे, असदे, जातेडे, पेामगाव, पाथरशेत-पळसे-बेंबटमाळ-चिखली, तव.
अनुसुचित जाती
उरावडे, दखणे, काशिंग-शिंदेवाडी, भादस बु,गावडेवाडी-शिळेश्वर, चांदे.
अनुसुचित जाती स्त्री
कासारसाई, जांबे, चांदिवली-शिरवली, वातुंडे, भांबर्डे-घुटके-आडगाव-तैलबैल-एकोले,
अनुसुचित जमाती
कुंभेरी, संभवे.अनुसुचित जमाती स्त्रीकोळवडे, ताम्हिणी.