अभिनेता विवेक ओबेरॉयवर मुंबई पोलिसांची कारवाई

0
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबोरॉय याच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने हेल्मेट न वापरता मुंबईच्या रस्त्यावरून दुचाकी चालविल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला दंडात्मक कारवाई केली आहे.

मुंबईच्या रस्त्यावर हेल्मेट न घालता अभिनेता विवेक ओबोरॉय याने त्याच्याकडील महागड्या दुचाकीवरून फेर फटका मारला. याबाबत पत्रकार बिनू वर्गसे यांनी मुंबई पोलिसांना ट्विट करुन माहिती दिली. वर्गसे यांच्या ट्विटची मुंबई पोलिसांनी तत्काळ दखल घेतली.

अभिनेत्ता विवेक ओबोरॉय यांनी तोडलेल्या वाहतूक नियमांची माहिती घेतली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सांताक्रूझ वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकिशोर जाधव यांनी अभिनेता विवेक ओबोरॉय याच्यावर कारवाई केली आहे.

पिबी 65, एएच 9103 या दुचाकीवरील अभिनेता विवेक ओबोरॉय याच्यावर 500 रुपयांचा दंड आकाराला आहे. याबाबतचे चलन वाहतूक पोलिसांनी पाठवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.